By  
on  

Video : अरे हे काय ... शेवंता चक्क बनली भेळपुरीवाली

करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतोय. करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढच होताना पाहायला मिळतेय आणि ही महाराष्ट्रासाठी व देशासाठी चिंतेची बाब आहे. सर्व दैनंदिन व्यवहार कोलमडले आहेत. नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. 

आपले सेलिब्रिटीसुध्दा या सेल्फ क्वारंन्टाईनमध्ये घरातच राहून सर्वांना सुरक्षित राहण्याचं आवाहान करतायत. आज जर करोनापासून बचाव करायचा असेल तर घरी बसणं ही त्याबबातची खबरदारी घेण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. 

याच क्वारंन्टाईन दरम्यान तुमच्या सर्वांची लाडकी शेवंता चक्क भेळपुरीवाली बनलीय…विश्वास बसत नाही ना, मग हा व्हिडीओ पाहा. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Quarantine brought back the chef in me .... Chat specialist #quarantine #familytime #chefinme #stayhome #apurvanemlekar

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला स्वयंपाकाची खुप आवड आहे. या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग ती विविध पदार्थ बनविण्यासाठी करते. नुकतंच तिने कुटुंबियांसाठी भेळपुरी-पाणीपुरीचा चमचमीत बेत आखला व त्याचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला. अपूर्वाचा अवतार पाहून चाहतेही भलतेच खुश झाले आणि त्यांनी यावर कॉमेंट्स व लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Quarantine time brought back the chef in me #stayhome #chefinme #quarantine #spendingtimewithfamily #gocorona

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

अपूर्वा अनेकदा रात्रीस खेळ चाले २ च्या सेटवरही टीमसाठी स्वयंपाक करताना पाहायला मिलालीय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive