By  
on  

सुष्मिता सेनसोबत केली जातेय या मराठमोळ्या अभिनेत्रीची तुलना

आधी अभिनेत्री मग यशस्वी निर्माती आणि आता पुन्हा अभिनेत्री. इतकंच नाही तर एका डॅशिंग आणि डार्लिंग म्हणून ती तुमच्यासमोर आली आहे. ब-याच काळानंतर तिने छोट्या पडद्यावर ‘डॉक्टर डॉन’ मालिकेतून पुनरागमन केलं. बरोबर ओळखलंत आम्ही बोलतोय प्रसिध्द अभिनेत्री श्वेता शिंदेबदद्ल. श्वेता आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्यात नेटकरी तुलना करतायत. श्वेता ही सुष्मिता साऱखीच दिसतेय व तिची व्यक्तिरेखासुध्दा ‘ मै हू ना’ या बॉलिवूड सिनेमातल्या सुष्मिता सारखीच मिळती जुळती आहे. विद्यार्थी आणि शिक्षिकेची अनोखी प्रेमकहाणी. 

एका वेबसाईटशी बोलताना श्वेता म्हणाली, सुष्मिताचे फोटो मला भूमिका सांगताना दाखवण्यात आले होते. मालिकेतील माझा पेहराव आणि लुक अगदी तसाच असेल असं मला सांगण्यात आलं. सुष्मिता माझी आवडती अभिनेत्री आहे, त्यामुळे तिच्यासारखं दिसायचं आहे, ही माझ्यासाठी पर्वणी. आता जेव्हा प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते तेव्हा खुप आनंद होतो.

मेडिकल कॉलेजच्या एका शिस्तप्रिय आणि कठोर डीनची भूमिका श्वेता छोट्या पडद्यावर हुबेहूब साकारतेय. कॉलेजची ही डीन, डॉक्टर डॉनच्या, म्हणजेच तिच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली आहे.अभिनेता देवदत्त नागे ह्या विद्यार्थ्यासोबत या डार्लिंग डीनची अफलातून केमिस्ट्री रंगल्याचे मालिकेत पाहायला मिळतेय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive