By  
on  

पाहा Video : “राघव तू बाबांशी गोड बोल”, स्वप्निल आणि मुलगा राघवचा हा क्यूट व्हिडीओ पाहिला का ?

 मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीही शुटिंग बंद असल्याने आणि सध्या घरीच थांबण्याच्या सुचना असल्याने त्याचं पालन करत आहेत. नेहमी शुटिंगमध्ये व्यस्त असणाऱ्या या कलाकारांना या निमित्ताने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. या निवांत वेळी कलाकार आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. अभिनेता स्वप्निल जोशीही त्याच्या मुलांसोबत, कुटुंबासोबत वेळ घालवतोय. नुकताच त्याने चित्र काढतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला होता.
शिवाय मुलगा राघवसोबत स्वप्निलची मस्तीही सुरु आहे. “राघव तू बाबांशी गोड बोल” असं म्हणत स्वप्निल आणि राघवचा क्यूट व्हिडीओ चर्चेत आला आहे. मुलगा राघवही वडिल स्वप्निलला या व्हिडीओत साथ देताना दिसतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@swwapnil_joshi #swwapniljoshi #homequarantine #stayhome

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

सध्या सोशल मिडीयावर कोरोना व्हायरस विषयीच्या नकारात्मक पोस्ट पाहायला मिळत असल्या तरी अशा सकारात्मक पोस्ट वेगळी उर्जा देत आहेत. या मोठ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन महत्त्वाचा असून घरी राहून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचं आवाहन ही कलाकार मंडळी करत आहेत. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive