पाहा video : शेवंताने बनवला गाजर हलवा , कलाकार मंडळी घरात राहून बनलेत शेफ

By  
on  

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर सगळेच घरी बसले आहेत. मनोरंजन विश्वही बंद असल्याने कलाकार मंडळीही घरातच आहेत. मात्र घरात बसून ही कलाकार मंडली त्यांचा छंद जोपासतानाही दिसत आहेत. या वेळेचा सदुपयोग कसा करावा हे काही कलाकार मंडळींच्या सोशल  मिडीया पोस्ट बघूत पाहायला मिळतय. 

रात्रीस खेळ चाले या प्रसिद्ध मालिकेतील शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर काही कालावधीतच प्रचंड प्रसिद्ध झाली. तिच्या शेवंता या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. सोशल मिडीयावरही तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सध्या अपूर्वा घरात बसून तिची कुकिंगची आवड जोपासतेय. अपूर्वाचा सध्या शेफ मोड ऑन आहे. म्हणूनच घरात बसून अपूर्वा ही विविध पदार्थ बनवताना दिसत आहे. एवढच नाही तर सोशल मिडीयावर अपूर्वा तिच्या कुकिंगचे व्हिडीओही पोस्ट करत आहे. नुकतच तिने घरात भेळपुरी, पाणीपुरीचा बेत केला होता. त्याचा मजेशीर व्हिडीओही तिने पोस्ट केला होता. नुकतच अपूर्वाने घरात गाजर हलव्याचा बेत केला. त्याचेही फोटो तिने पोस्ट केले आहेत. शिवाय म्युझीक ऐकता ऐकता अपूर्वा स्वयंपाक घरात कुकिंग करत असल्याची पोस्टही तिने केली आहे. घरात बसून अपूर्वाला तिच्या कुकिंगची आवड जोपासता येत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Gajar Halwa . . #apurvanemlekar #gajarhalwa #chefinme #quarantineandchill #quarantine #shevanta #shevantalovers #coronadays

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

सध्या कलाकारांच्या माध्यमातून अशा पद्धतिने घरात बसून कसा सकारात्मक दृष्टीकोन ठेवता येईल याची बरीच उदाहरणे सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत.
 

Recommended

Loading...
Share