By  
on  

 पाहा Video : लॉकडाउन नंतर तुमचा वेळ वाचवण्यासाठी दररोजच्या गोष्टींची आत्ताच सवय लावा – नेहा पेंडसे 

सोशल मिडीयाच्या माध्यमातून सध्या लॉकडाउच्या काळात घरात बसून काय काय करता येईल याचे नवनवीन उपक्रम पाहायला मिळत आहेत. त्यातच कलाविश्वातील कलाकार मंडळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध गोष्टी सांगत आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर विविध कलाकार काहीना काही पोस्ट करत आहेत. त्यातच अभिनेत्री नेहा पेंडसे बऱ्याच दिवसांनी या विषयावर बोलती झाली आहे. नेहाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत घरात बसून आणखी कोणती गोष्ट करता येईल याविषयी नेहा सल्ला देत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

नेहा म्हणते की, “ या दिवसांत मला खूप वाईट सवयी लागल्या होत्या. उशीरा उठणं वैगेरे या गोष्टी मी करत होते. मात्र नंतंर याविषयी मला त्या गोष्टी लक्षात आल्या. मला नंतर जाणवलं की 21 दिवसांमध्ये दररोजचा जो दिनक्रम असायचा तो करता येईल. मी वॉड्रॉब नीट केलाय, किचन साफ केलय. मग मी विचार केला की मेकअप करायला खूप वेळ लागतो मला. ही योग्य वेळ आहे की तुम्ही मेकअप शिकून घ्या आणि लवकरात लवकरत मेकअप कसा करता येईल हे शिकून घ्या जेणेकरून जेव्हा हे सगळं सुरळीत होईल तेव्हा तुमचा वेळ वाचेल. दररोजच्या ज्या गोष्टी करायला वेळ लागतात त्या गोष्टी लवकरात लवकर कशा करता येतील हे बघा म्हणजे जेव्हा सगळं सुरळीत होईल तेव्हा तुम्हाला सोपं जाईल.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Throwback ️

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

या व्हिडीओतून नेहाने अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगीतली आहे जेणेकरून दररोजचा दिनक्रम जेव्हा सुरु होईल तेव्हा या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive