Lockdown मध्ये बोअर झालात? ही विनोदी नाटकं तुम्हाला नक्कीच हसवतील

By  
on  

 करोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे आज देशभरात लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. आजपर्यंत जगभरात जवळपास तीन अब्ज लोक घरात बंदिस्त आहेत. दैनंदिन जीवनात अनेक कामांनी व्यस्त असलेले अनेकजण आज लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडलेले आहेत. 
वेळ कसा घालवायचा हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत निवडक नाटकांची अशी लिस्ट ज्यामुळे तुम्हाला अजिबात बोअर होणार नाही. पुरेशा डाटासह तुम्ही ही नाटकं युट्युबवर पाहून आनंद घेऊ शकता. जाणून घ्या कोणकोणती नाटकं आहेत ही..... 

मोरुची मावशी:  
विजय चव्हाण, प्रशांत दामले यांच्या अभिनयाने सजलेलं हे नाटक पाहताना तुम्हाला क्षणभराचाही कंटाळा येणार नाही. मावशीच्या भूमिकेत असलेले विजय चव्हाण अत्यंत सुरेख दिसतात. हे नाटक युट्युबवर पाहू शकता. 

 

 

श्रीमंत दामोदरपंत: 
भरत जाधवच्या अभिनयाने सजलेलं नाटक म्हणजे श्रीमंत दामोदरपंत. क्षणात भोळाभाबडा दामू आणि क्षणात कठोर शिस्तीचे दामोदर पंत भरतने कमाल साकारले आहेत. याशिवाय विजय चव्हाण यांनी साकरलेले दामूचे वडिल आणि सोबतच घरातील इतर कलाकारांचं काम प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडतं. हे नाटक युट्युबवर पाहू शकता.

 

 

शांतेचं कार्टं चालू आहे : 
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कॉमिक टायमिंगमुळे या नाटकाने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. याशिवाय कजाग आईच्या व्यक्तिरेखेत असलेल्या नयनतारा यांचा अभिनयही लाजवाब आहे. याशिवाय सुधीर जोशी, रुही बेर्डे, रविंद्र बेर्डे यांचं कामही उत्तम आहे. हे नाटक युट्युबवर उपलब्ध आहे.

 

 

 यदाकदाचित: 
महाभारत मराठी रंगभूमीवरील विनोदवीरांनी साकारल्यावर काय धमाल येईल ही या नाटकात पाहता येईल. या नाटकाचे पार्ट युट्युबवर उपलब्ध आहेत. आतचे अनेक प्रथितयश विनोदी कलाकार यात भूमिका साकारताना दिसतील. 

 

 

पती सगळे उचापती: 
मित्राला काकाच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी केलेल्या उचापती आणि त्यातून होणारी धमाल विनोद निर्मिती तुम्हाला हसवून बेजार करेल. कुलदिप पवार यांनी रंगवलेले काका नाटकात जान आणतात. हे नाटक तुम्ही युट्युबवर पाहून शकता.

 

 

 

 

Recommended

Loading...
Share