पाहा Video : किशोरी शहाणे फार्म हाऊसवर असा घालवत आहेत वेळ

By  
on  

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कलाकार मंडळी घरीच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. सध्या सगळ्या शुटिंग बंद असल्याने मनोरंजन विश्वातील कलाकार घरीच आहेत. 

अभिनेत्री किशोरी शहाणे या सोशल मिडीयावर प्रचंड एक्टिव्ह असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ अपडेट्स त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळतात. लॉकडाऊनमुळे किशोरी शहाणे या त्यांच्या फार्म हाऊसवर कुटुंबासोबत आहेत. या फार्म हाऊसवरच त्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. फार्म हाऊनमधील बागेत त्यांनी मेथी उगवली आहेत. आणि याच उगवलेल्या मेथी काढतानाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.  याच मेथीची त्या भाजी बनवणार असल्याचही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. 

अभिनेत्री किशोरी शहाणे या मराठी चित्रपटसृष्टीत गेली कित्येक वर्ष काम करत असून काही हिंदी सिनेमांमध्येही त्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या आहेत. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातही त्या स्पर्धक म्हणून दिसल्या होत्या. 
 

Recommended

Loading...
Share