आता देशभराता करोनाचं संकट आहे, व ते पळवून लावण्यासाठी खबरदारी म्हणून प्रत्येकाने घरात बसणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व सेलिब्रिटीसुध्दा घरी बसून आहेत व करोनाला आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणांना सहकार्य करतायत. मग अशात फिटनेसचं काय, जीम तर बंद आहेत.
मराठी सिनेसृष्टीतला हॅंडसम हंक अभिनेता म्हणून गश्मीर महाजनी ओळखला जातो. अभिनयासोबतच त्याच्या फिटनेसचं, पिळदार शरीरयष्टीचं नेहमीच सर्वजण कौतुक करतात. सोशल मिडीयावरसुध्दा गश्मीर बराच अॅक्टीव्ह असतो. सतत काही नवनवीन अपडेट्स तो चाहत्यांसोबत शेअर करतो. जीम बंद असली म्हणून काय झालं, व्यायाम बंद होऊ शकत नाही असं गश्मीरने आपल्या व्हिडीओतून सर्वांना सांगितलं आहे. तो दरवाज्याच्या लोखंडी गेटला पकडून पुश-अप्स करताना पाहायला मिळतोय, पण या दरम्यान त्याने नेटक-यांना एक जबरदस्त ताकीद वजा दमच भरला आहे.
गश्मीर म्हणतो, “मराठी माणूस आहेस तर मराठीत का बोलत नाहीस अशी कमेंट केली तर ब्लाॅक करुन टाकीन। माझं मराठीपण सिद्धं करायला मला प्रत्येक वेळी मराठीतच बोलायची गरज नाही। Exercise ... boost your immunity. Stay home, stay safe” लगेचच त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव झाला आहे.
अलिकडेच गश्मीर अभिनेत्री पूजा सावंतसह ‘बोनस’ या सिनेमात झळकला होता. आजोबांनी दिलेल्या एका आगळ्या-वेगळ्या चॅलेंजची गोष्ट ह्यात पाहायला मिळाली. तर लवकरच तो दिग्दर्शक-अभिनेते प्रविण तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिकपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.