दरवर्षी 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. 1961मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस जाहीर केला. आणि पहिला जागतिक रंगभूमी दि 1962 मध्ये साजरा झाला. आणि याच रंगभूमी दिनाच्या निमित्ताने मराठी कलाकार मंडळींनीही सोशल मिडीयावर हा दिवस साजरा केलाय. बऱ्याच कलाकारांनी रंगमंचावरील त्यांचा फोटो पोस्ट करत जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी त्यांचे रंगमंचावरील जुन्या आठवणींना उजाळा देत काही फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेता जितेंद्र जोशीला कविता वाचायची लिहायची प्रचंड आवड आहे. जागतिक रंगभूमी दिना निमित्त जितेंद्र जोशीने त्याने लिहीलेली कविता वाचून दाखवली. हा व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.
यासह बऱ्याच मराठी कलाकारांनी या दिवसाचं निमित्त साधून काही जुने फोटोही पोस्ट केले आहेत.
य़ा आणि अनेक कलाकारांनी सोशल मिडीयावर जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून रंगमंचावरील आठवणींना उजाळा दिलाय.
लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वही बंद आहे. त्यामुळे कलाकारही घरातच थांबून सोशल मिडीयावर व्यक्त होताना दिसत आहेत.