पाहा Video : अमेय वाघच्या 'सायकल'चा हा व्हिडीओ पाहिलात का ? अमेय सांगतोय त्याच्या पहिल्या प्रेमाविषयी 

By  
on  

जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने मराठी कला विश्वातील कलाकारही सोशल मिडीयावर त्यांच्या रंगमंचावरील आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांच्या रंगभूमीवरील या आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्यात. 
अभिनेता अमेय वाघलाही जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आठवण झालीय त्याच्या ‘सायकल’ या एकांकिकेची.

 

अमेय वाघ महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याने ही एकांकिका केली होती. अमेयचा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक निपूण धर्माधिकारीने ही एकांकिका दिग्दर्शित केली होती. अमेयने सोशल मिडीयावर या एकांकिकेतील छोटासा भाग व्हिडीओच्या माध्यमातून पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये अमेय लिहीतो की, "कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला असताना आम्ही ही सायकल नावाची एकांकिका केली होती. निपूण धर्माधिकारीने डायरेक्ट केली होती. आमची अख्खी टीम कमाल होती. त्या आठवणींमध्ये अजूनही रमतो. त्यातली एक झलक. माझ्या पहिल्या प्रेमाच्या दिनाच्या शुभेच्छा”

या व्हिडीओमधून अमेयने एक छान आठवण शेयर केली आहे. अमेय वाघ आणि निपूण धर्माधिकारी यांची मैत्री फार वर्षांपासून आहे. अजूनही दोघं एकत्र मिळून कास्टिंग काउच हा शोदेखील करतात. बऱ्याच वर्षांपूर्वीचा दोघांचा हा व्हिडीओ पाहून सोशल मिडीयावरील त्यांच्या चाहत्यांना गंमत वाटतेय. म्हणूनच या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षावही होतोय. 


इतर कलाकार मंडळीही जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सोशल मिडीयावर विविध पोस्ट करत आहेत. 
 

Recommended

Loading...
Share