मराठीतल्या मॅचो मॅनचे हे झक्कास फोटो पाहून तुम्ही व्हाल फिदा!

By  
on  

मराठी सिनेसृष्टीत पिळदार शरीरयष्टी असलेल्या अभिनेत्यांमध्ये अल्पावधीतच आपलं खास स्थान निर्माण करणारा आणि ऐतिहासिक भूमिकांमधून आपली छाप पाडणा-या अंकीत मोहनबदद्ल जाणून घेऊयात. 

अंकित हा अमराठी असून हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील तो प्रसिद्ध चेहरा आहे.

‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आलेला अभिनेता अंकित मोहन आता ‘मन फकिरा’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आल. मागील दोन सिनेमांमधून अंकितने ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारली होती. 

‘मन फकिरा’तून त्याने आजच्या तरुणाचं नेतृत्व केलं. तो रोमॅंटिक भूमिकेत दिसला.  या अभिनेत्री सायली संजीवसोबत त्याची कैमिस्ट्री पडद्यावर  जबरदस्त पाहायला मिळाली. 

याशिवाय अंकित कुमकुम भाग्य’, ‘महाभारत’ आणि ‘नागीन 3’ या हिंदी मालिकांमध्येही झळकला होता. 

तसंच झी टीव्हीवरील हैवान या मालिकेतसुध्दा अंकित प्रमुख भूमिकेत होता. 

अंकितच्या पत्नीचे नाव रुची सवर्ण असून ती मुळची नागपूरची आहे. रुचीचा जन्म मराठी कुटुंबात झाला. ती पण एक अभिनेत्री आहे. 

फर्जंदद्वारे अंकितला मराठी सिनेसृष्टीत मोठा ब्रेक मिळाला आहे. या चित्रपटातील शीर्षक भूमिका त्याने वठवली आहे. हिंदी भाषिक असलेल्या अंकितने पत्नी रुचीकडून मराठी शिकून घेतले. 
अंकित मोहनने कोंडाजी फर्जंद अगदी हुबेहूब साकारला आहे.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित आगामी ऐतिहासिक जंगजौहरमध्येसुध्दा अंकित पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिका साकारतोय. 

अंकित फिटनेस फ्रिक आहे, त्याला नेहमी फिटनेसकडे लक्ष द्यायला आवडतं. 

 


 

Recommended

Loading...
Share