By  
on  

ही मदत आम्ही अशीच सुरु ठेवणार : सुशांत शेलार

संपूर्ण जग करोनाशी दोन हात करतंय. भारतातही तबब्ल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सर्वच व्यवहार ठप्प झाले आहे. हातावर पोट असलेल्यांचं मात्र यामुळे मोठं नुकसान होत आहे. त्यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. 

मराठी कलाकारांनी मात्र या संकटकाळी आपली बांधिलकी जपली आहे. यामध्येच रंगमंच कामगार संघटना आणि काही कलाकार मंडळींनी त्यांच्या मदतीचा हात दिला आहे. मराठी कलाकार म्हणून वाटचाल सुरु असताना ह्या प्रवासात ज्यांनी पाणी आणून दिलं, जेवण वाढलं, चेहऱ्याला लागलेला रंग जपायला मदत केली, कपडे इस्त्री केले, सेटवर खिळे ठोकले, नाटकाची प्रॉपर्टी सांभाळली...थोडक्यात ज्यांचं त्यादिवशीच्या पैशांवर/पाकिटावर पोट भरत होतं, अशांना आपण मदतीचा हात द्यायचं ठरवलं

 बँकस्टेज आर्टिस्ट, प्रॉपर्टी बॉइज, मेकअप सहाय्यक, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज, सेटिंग बॉइज, तंत्रज्ञ इत्यादी....  अशांनाकाही दिवस पुरेल इतका शिधा आणि औषधं वगैरे इतर खर्चासाठी रोख रुपये १००० अशी मदत करण्याचे ठरवले आहे

‘रंगमंच कामगार संघटना आणि कलाकारांनी स्वखुशीने ही मदत केली असून यात नागरिकांना निदान एक महिना पुरेल इतका शिधा देण्यात आला आहे. यात तांदूळ, डाळ,साखर, तीळ, सॅनिटाझर या गोष्टींचा समावेश असून दैनंदिन दिवसामध्ये लागणारी भाजी, दूध नागरिकांना आणता यावं यासाठी १ हजार रुपयांची आर्थिक मदतही केली आहे. तसंच हे काम करण्यापूर्वी आम्ही परिवहन मंत्री अनिल परब यांची परवानगी घेऊनच हे केल्याचं अभिनेता सुशांत शेलार म्हणाला. 

‘आम्ही परेल, वरळी,गिरगाव, शिवडी, काळाचौकी अशा ठिकाणी राहणाऱ्या जवळपास ३०-४० कुटुंबांना मदत केली. असून हा मदतीचा हात असाच पुढे करत राहू . पुढच्या टप्प्यात, भांडूप, चेंबूर या ठिकाणी जाणार आहोत. या कार्यामध्ये रंगमंच कामगार संघटनेप्रमाणेच अनेक कलाकारांचा समावेश आहे. सुबोध भावे, भरत जाधव ही कलाकार मंडळीही मदत करत आहे’, असंही सुशांतने स्पष्ट केलं. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive