Video : शर्मिष्ठा राऊतला नेटकरी म्हणाले, 'कामवाली'

By  
on  

सध्या करोनाचा संपूर्ण देशात कहर सुरुय. महाराष्ट्रात तर करोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सक्तीने २१ दिवसांचा लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे. सर्वांनी जिथे असाल तिथेच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

लॉकडाऊन काळात घराबेहर पडण्यास सक्त मनाई आहे. सर्वचजण आज घरात आहेत व क्वारंटाईनचा हा काळ व्यतीत करत आहे. लाडके सेलिब्रिटीसुध्दा घरी राहूनच सर्वांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करतायत. पण हा वेळ घालवण्यासाठी कोमी वाचन करतंय तर कोणी गाणं शिकतंय तर कोणी घरच्या घरी फिटनेसला महत्त्व देतंय. 

पण बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठाचा मात्र क्वारंटाईन काळातील घरात झाडू काढतानाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. घराची साफसफाई करत असतानाचे काही व्हिडिओ शर्मिष्ठानं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांनी याबद्दल तिचं कौतुक केलं असलं तरी काही नेटक-यांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. एक युजरनं शर्मिष्ठाला 'कामवाली मावशी' असं म्हटलं आहे. तर तिचा सह अभिनेता शशांक केतकरची पत्नी प्रियांका केतकर हिनं देखील शर्मिष्ठाची फिरकी घेत , मावशी... घरी या ना... अशी कंमेंटकेली आहे.

शर्मिष्ठाची  मन बावरे ही कलर्स मराठीवरील मालिका बरीच लोकप्रिय आहे तर यापूर्वी ती ‘मन उधाण वा-याचे’ व ‘जुळून येती रेशीम गाठी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. 
 

Recommended

Loading...
Share