सध्या क्वारंटाईन काळात तब्बल २१ दिवस प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडणार नाही अशी सरकारने सक्त ताकीद दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.
या क्वारंटाईन काळात लाडके सेलिब्रिटीसुध्दा घरीच कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. कोणी छंद जोपासतोय तर कोणी घरकामात व्यस्त आहे तर कोणी जुन्या आठवणीत रममाण झालं आहे. अशाच जुन्या आठवणीत रमलेल्या स्पृहा जोशीने आजी-आजोबा लहानपणी ज्या गोष्टी आम्हा नातवडांना सांगायचे त्यात खरं सुख होतं, असं म्हणत एक खुप छान जुनी आठवण मस्त फोटोसह शेअर केली आहे.
स्पृहा म्हणते, “आठवणींपैकी सगळ्यात जवळची कुठली हे सांगणं खूप अवघड आहे. पण तरीही माझ्या आजोबांसोबतच्या माझ्या आठवणी खूप precious आहेत. आजोबा रंगवून रंगवून सांगायचे. आजीही. पण आजीच्या गोष्टी तितक्या रंजक नसायच्या. 'एकदाच्या ह्या कार्ट्या झोपू दे', असं फिलिंग त्यामागे जास्त असायचं. आजोबांचं तसं नव्हतं. एक तर ते उत्तम actor होते. अरुण सरनाईकांसारखे दिसायचे सेम टू सेम! संधी मिळाली असती तर बंदा धूम मचाके रखता था. पण तसं व्हायचं नव्हतं. BEST च्या ऑफिस मध्ये काम करताना बॅडमिंटन ही मागे पडलं आणि ॲक्टिंगही. ती हौस बहुधा आम्हा नातींना गोष्ट सांगताना भागवून घेत असावेत ते. आमच्या चेहऱ्यावरचे बदलत जाणारे भाव, उत्कंठा, याची मजा घेत अगदी curiosity ताणत, गोष्टींचा climax करायचे. He was a fantastic storyteller. आवडती-नावडती, अकबर-बिरबल, जपानी बाईचा पंखा अशा किती गोष्टी आजोबांच्या आवाजात मला अजून ऐकू येतात. किती वेळेला त्याच गोष्टींचा repeat telecast त्यांचा लॉयल ऑडियन्स मनापासून ऐकायचा. हे नाही मिळत सगळ्यांना. आजोबा आणि एकमेकींना चिकटून आपापल्या दुलयांमध्ये शिरून गोष्टी ऐकणाऱ्या आम्ही चौघी. I'm forever grateful for this memory !!
- स्पृहा
तुम्हाला कोणत्या आठवणीबद्दल कृतज्ञ वाटतं मला नक्की सांगा.”
स्पृहा जोशीच्या या नॉस्टॅलेजिआवरुन अनेकांनी कॉमंट्समध्ये आपापल्या आठवणी शे्र केल्या आहेत. स्पृहा लॉकडाऊनचे २१ दिवस विविध गोष्टी आणि आठवणींमधून कृतज्ञता व्यक्त करत आहे व सोशल मिडीयावर ते शेअर करतेय.