By  
on  

 प्राजक्ताची आई म्हटली “हिचं कसं होणार ?” ,  प्राजक्ताने थेट बनवली व्हेज जयपुरी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाउनचा काळ सुरु आहे. या काळात सगळेच घरात बसून नवनवीन गोष्टी करत आहेत. यातच बहुतांश लोकं स्वयंपाक घराकडे वळली आहेत. कधी नव्हे ते कुकिंग शिकणं, घर कामात मदत करणं या गोष्टी सुरु आहेत. कला विश्वातील काही कलाकारांनीही सध्या स्वयंपाक घराचा ताबा घेतलाय.

अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील तिच्या घरी आहे. सध्या प्राजक्ता आईला स्वयंपाक घरात आणि घरकामात मदत करतेय. हे तिने स्वत: सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगीतलं आहे. नुकतच प्राजक्ताने स्वत: जेवणीही बनवलं.  प्राजक्ताने व्हेज जयपुरीचा बेत केला आणि सगळ्यांना खाऊ घातलं. याचा व्हिडीओही तिने पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये प्राजक्ता लिहीते की, “गेला आठवडाभर आईच्या मुखकमलावरचे “हिचं काय होणार” हे भाव बघून तिची दया आली. मग थेट व्हेज जयपूरीच केली (अर्थात पुस्तकात बघून. विशेष म्हणजे सगळ्यांनी भाजी खाल्ली.”

सध्या बरेच कलाकार घरात बसून त्यांचा छंद जोपासत आहेत. लॉकडाउनच्या निमित्ताने मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग काहीजण करत आहेत. तर काही या निमित्ताने आपल्या कुटुंबासोबत  वेळ घालवत आहेत. 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive