सध्या देशासह जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बाधीत रुग्णांच्या मदतीसाठी पंतप्रधान आणि मुंख्यमंत्री सहाय्यता निधीची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील मंडळी यासाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. यात कला विश्वातील कलाकारांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. बऱ्याच हिंदी आणि मराठी कलाकारांनी यासाठी मदत केली आहे.
मराठी कलाकार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. अभिनेता सिध्दार्थ जाधवनेही यासाठी योगदान केलय. सध्या या मदतीची गरज लक्षात घेता सिध्दार्थनेही यात मदतीचा हात पुढे केला आहे.
याशिवाय अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, नाना पाटेकर यांच्यासह इतर मराठी कलाकारही शक्य तितका निधी दान करत आहेत. मुख्य म्हणजे यापैकी बुहतांश मराठी कलाकारांनी या रक्कमेचा आकडा समोर येऊ न देता हे दान केलं आहे.