By  
on  

विक्रम फडणीस घेऊन येणार आणखी एक मराठी सिनेमा? 

‘हृदयांतर’ या मराठी सिनेमातून फॅशन दुनियेतलं मोठं नाव मराठी चित्रपट सृष्टीत आलं. ते म्हणजे प्रसिद्ध कॉश्यूम डिझायनर विक्रम फडणीस हे नाव. 2017मध्ये आलेल्या या सिनेमातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्यानंतर मागील वर्षी 2019मध्ये ‘स्माईल प्लीज’ हा मराठी सिनेमा घेऊन आले. त्यांच्या या दोन्ही सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. शिवाय दोन्ही सिनेमांचे प्रमोशन कार्यक्रम ही हटके पद्धतिने आणि ग्रँड करण्यात आले होते. आणि आता पुन्हा एकदा आणखी एक सिनेमात ते घेऊन येणार आहेत. 


विक्रम फडणीस यांनी नुकतीच सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आगामी सिनेमाविषयी घोषणा केली आहे. सध्या या सिनेमाच्या लिखाणाचं काम सुरु असल्याचं त्यांच्या पोस्टमधून पाहायला मिळतय. विक्रम फडणीस त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात की, “7 जुलै 2017 ‘हृदयांतर’, 19 जुलै 2019 ‘स्माईल प्लीज’. आणि आता आगामी प्रोजेक्टवर काम करतोय, जो असेल भिती, धैर्य, आशा, विजयाचा भावुक करणारा प्रवास”

विक्रम फडणीस यांच्या या पोस्टने आता उत्सुकता वाढली आहे. हा प्रोजेक्ट कसा असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्यांच्या मागील सिनेमांच्या प्रमोशनल कार्यक्रमात चक्क मोठ्या बॉलिवुड कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्या सिनेमांच्या कार्यक्रमांनी सगळ्यांचच लक्ष वेधलं होतं. ‘हृदयांतर’ या सिनेमात अभिनेत्री मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि सोनाली खरे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर ‘स्माईल प्लीज’ या सिनेमात ललित प्रभाकर, मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, आदिती गोवित्रीकर  हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तेव्हा विक्रम फडणीस यांच्या आगामी सिनेमात कोणते कलाकार असतील याची देखील तेवढीच उत्सुकता आहे. शिवाय या आगामी सिनेमातही अभिनेत्री मुक्ता बर्वे असेल की नाही हे देखली अद्याप गुलदस्त्यात आहे. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive