By  
on  

पाहा Video : घरकोंबडा अमेय वाघचे #punचटjokes आणि मजेशीर व्हिडीओ पाहिलेत का?   

अभिनेता अमेय वाघ नुकताच अमेरिकेहून भारतात परतला आहे. त्याच्या हातावर होम क्वारंटीनचा शिक्कादेखील आहे. म्हणून घरात बसून काहीतरी मजेशीर करण्याचा प्रयत्न अमेय करतोय. लॉकडाउनच्या काळात घरी असलेल्यांचही मनोरंजन करण्याचं अमेयने ठरवलं आणि केले काही मजेशीर व्हिडीओ.

अमेया वाघच्या सोशल मिडीया अकाउंटवर विविध व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये अमेय किचनमध्ये जेवण बनवतानाचे, भांडी घासतानाचे मजेशीर व्हिडीओ आहेत. मात्र अमेयने नुकत्याच केलेल्या व्हिडीओची सध्या प्रचंड चर्चा आहे. या व्हिडीओत अमेय टेनिस मॅच पाहतोय. ही मॅच पाहत असताना त्याने बऱ्याच प्रसिद्ध टेनिसपटूंच्या नावांचा मजेशीर वापर करुन तयार केलेला हा व्हिडीओ आहे. फक्त अमेयचं नाही तर त्याच्या काही मित्रांनी मिळून ही कल्पना सुचवली असल्याचं अमेय या पोस्टमध्ये लिहीतो.पोस्टमध्ये अमेय वाघ लिहीतो की, “जेव्हा lockdown मध्ये एक मराठी माणूस tv वर tennis लावून बसलेला असतो!! (ह्या video मध्ये आमच्या अनेक छपरी मित्रांचा सहभाग आहे)”

बरेच कलाकार लॉकडाउनच्या निमित्ताने घरात बसून नवनवीन गोष्टी करत आहेत. त्यातच अमेय वाघच्या विविध एन्टरटेनिंग व्हिडीओचंही कौतुक होत आहे. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive