By  
on  

पोलिसांच्या या कामगिरीवर सुमीत राघवन झाला खुश, केलं कौतुक

 करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सगळीकडे जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. पोलिस प्रशासन आपल्या परीने यात सहभाग घेत आहे. पोलिसांकडून अनेकदा माईकच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. अशाच एका पोलिसाचा जनजागृतीसाठी गाणं गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सुमीत राघवनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला. यासोबत पोलिसांचं कौतुक केलं आहे

 

 

‘क्या बात है सर…क्या बात है… सूर, स्माइल, एनर्जी, सकारात्मकता उत्तम आहे. असे फंडे वापरणा-या पोलिसांना सलाम. अशा प्रयत्नांना समाजाकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.’ या शब्दात सुमीतने गाणा-या पोलिसांचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या 302 असल्याने काही ठिकाणी लॉकडाऊन अधिक कठीण करण्यात आलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive