By  
on  

कोरोनाग्रस्तांसाठी या मराठी अभिनेत्याचाही मदतीचा हात, केली पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीत मदत 

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान केअर फंड आणि मुख्यमंत्री रिलीज फंडची स्थापना करण्यात आली असून विविध क्षेत्रातील मंडळी दान करण्यासाठी पुढे येत आहेत. बॉलिवुड कलाकारांसह मराठी कलाकारही यात योगदान करत आहेत. 

अभिनेता आरोह वेलणकरनेही यात मदतीचा हात पुढे केला  आहे. आरोहने पीएम केअर आणि सिएम रिलीफ फंड या दोन्ही निधीत मदत केली आहे. शिवाय आरोह म्हणतो की, “मी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीसाठी दान केलं आहे.  मी माझ्या परिवाराला, मित्रमंडळींना आवाहन करतो की तुम्हीही यासाठी पुढे या दान करा. सध्या परिस्थिती खुप वाईट आहे. तुम्हीही यासाठी दान करण्यासाठी लोकांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहीत करा.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Just like metal. #bronze #actor #photoshoot #look #metal #actorlife #randomupload #quarantineandchill

A post shared by Aroh Welankar (@arohwelankar) on

आत्तापर्यंत अभिनेता सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर आणि इतर बऱ्याच मराठी कलाकारांनी या सहाय्यक निधीसाठी दान केलं आहे. आरोहने आत्तापर्यंत विविध सिनेमा, नाटकांमधून काम केलेलं आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात आरोहने वाईल्ड कार्ड एन्ट्री केली होती. या शोमध्ये त्याने ग्रँड फिनाले  पर्यंत मजल मारली होती. 
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive