आपल्याला आपले जुने फोटो किंवा जुन्या आठवणी पाहायला मजेशीर वाटतात. कलाकारांच्या बाबतीतही क्वारंटाईनमध्ये असचं काहीसं होत आहे. सध्या कला विश्वातील कलाकार लॉकडाउनमुळे घरातच आहेत. आणि या दरम्यान त्यांना काही जुन्या आठवणी सापडत आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील तिच्या कुटुंबासोबत घरी आहे. यादरम्यान प्राजक्ता घर कामातही मदत करतेय. नुकतच प्राजक्ता तिचे कप्पे आवरत होती. आणि यावेळी तिला काही जुने फोटोज सापडले.
प्राजक्ताचे हे फोटो जवळपास 10 वर्षांपूर्वीचे आहेत. आणि म्हणूनच प्राजक्ताने हे जुने फोटो तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
या पोस्टमध्ये प्राजक्ता म्हणते की, “मी असं नाही बोलू शकत की हे माझं पहिलं फोटोशुट आहे. पण हे खुप जुने म्हणजे जवळपास 10 वर्षांपूर्वीचे फोटो आहेत. मी हे कबुल करते की मला कधी कधी माझ्या लांब केसांची आठवण येते. आईनं कप्पे आवरायवा काढले त्यामुळे हे फोटोज् सापडले.माझ्याकडून ती कप्पे आवरून घेतेय. खूप वर्षांनी “इतके दिवस” मी तिच्या तावडीत सापडले. #आराम के लिए हानिकारक अम्मा”
प्राजक्ताचे 10 वर्षांपूर्वीचे हे फोटो पाहून चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
प्राजक्ता आईला तर मदत करतेय शिवाय तिच्य कुकिंगची आवडही जोपासतेय. तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर ती सध्या काय काय करतेय हे पाहायला मिळतय.