अभिजीत खांडकेकर बनला शेफ, बनवली ही खास डिश

By  
on  

सध्या लॉकडाऊनमुळे जीवानावश्यक वस्तुंच्या दुकानांव्यतिरिक्त इतर सर्वच दुकानं बंद आहेत. त्यामुळे अभिजीत खांडकेकर चांगलाच पेचात पडला होता. पण त्याच्या मदतीला धावून आली अभिनेत्री भार्गवी चिरमुले. त्याचं झालं असं अभिजीतची पत्नी सुखदाचा आज म्हणजेच एक एप्रिलला वाढदिवस होता.

 

 

पण बाहेर केक उपलब्ध होत नसल्याने अभिजीतने तो घरीच बनवायचं ठरवलं. पण हा पहिलाच प्रयत्न असल्याने त्याने अभिनेत्री भार्गवी चिरमुलेची मदत घेतली. या केकचा फोटो पोस्ट करताना अभिजीत म्हणतो, ‘बेकिंगचा पहिलाच प्रयत्न, हॅपी बर्थ डे. भार्गवी चिरमुले आणि युट्युबचे आभार.’ अभिजीतची पत्नी सुखदा उत्तम अभिनेत्री आहेच याशिवाय कुशल कथ्थक नृत्यांगनाही आहे.

Recommended

Loading...
Share