By  
on  

पाहा Video : सध्या सगळ्यांनी गरम पाणी प्यावं - प्राजक्ता माळी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या घरात बसूनही कोणती दक्षता पाळावी हे महत्वाचं आहे. यासाठी सोशल मीडियावर विविध व्हिडिओ ही उपलब्ध आहेत. वेळोवेली सरकारही महत्त्वाच्या सुचना करत  आहे. कला विश्वातील कलाकार मंडळीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करत आहेत. 

 

अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही सोशल मिडिया वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता ने पाणी पिण्याचे विविध फायदे सांगितले आहेत. पाणी कधी आणि का प्यावं याविषयी प्राजक्ता यात सांगतेय. लॉकडाऊन मुळे प्राजक्ता सुद्धा घरात आहे. मात्र घरात बसून दररोज एका व्हिडिओच्या माध्यमातून नेटकऱ्यांना महत्त्वाची माहिती प्राजक्ता देते. नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओतही प्राजक्ता ने महत्त्वाची माहिती दिली आहे.  

प्राजक्ता घरात बसून सध्या तिची कुकींग ची आवडही जोपासतेय. त्याचे व्हिडिओ ही तिने शेयर केले आहेत. सध्या कलाकार मंडळी घरात बसून विविध गोष्टी करत आहेत. आणि या अपडेट्स ते सोशल मीडिया वर पोस्ट करत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive