By  
on  

सुबोध भावे म्हणतोय, 'आता आपले पूर्वज ही यायला लागलेत'

करोनाने देशभर घातलेल्या थैमानामुळे सध्या संपूर्ण देशभारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात कोणालाही घराबाहेर पडण्यास मनाई आहे. फक्त अत्यावश्यक सेवा व वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरु आहे. म्हणूनच नागरिकांना घरात राहा, सुरक्षित राहा असं आवाहन करण्यात आलं आहे. आज प्रत्येक जण आपल्या घरात कैद आहे. 

मनोरंजन विश्वालसुध्दा याचा फटका बसल्याने सर्वच सेलिब्रिटीसुध्दा घरी आहेत. कोणी छंद जोपासतंय, व्यायामात वेळ घालवतोय तर कोणी घरकामात व्यस्त आहे तर कोणी आजूबाजूच्या परिसराचं छान निरीक्षण करतोय. आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सुबोध भावेने या निरीक्षणातून  एक छान फोटो टिपला आहे. तो म्हणतोय,  'आता आपले पूर्वज ही यायला लागलेत'..म्हणजे याचा अर्थ आता माकडं पुन्हा यायला लागली आहेत. तर त्याचं झालं असं त्याने त्याच्या बिल्डींगच्या पाईपवरुन माकडांना वर चढताना पाहिलं व क्षणार्धात फोटो टिपला.  आधी पक्षी येत होते आता पूर्वजही यायला लागेल अशा आशयाची त्याने पोस्ट केली आहे. 

एकूणच लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण घरी आहे व स्वत:ला कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये गुंतवू पाहतोय. तुम्ही पण घरीच राहा, सुरक्षित राहा.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive