अभिनेता अमेय वाघ आणि काही कलाकारांची टीम हे अमर फोटो स्टुडिओ या नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि त्यांचे प्रयोग रद्द झाले. त्यानंतर काही काळ अमेरिकेत राहून अमेय आणि त्याची टीम भारतात परतली. त्यानंतर अमेय वाघच्या हातावरही क्वारंटाईनचा शिक्का होता.
अमेय वाघचा हा क्वारंटाईनचा हा कालावधी नुकताच संपलेला आहे. याची माहिती त्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे. अमेय या पोस्टमध्ये लिहीतो की, “ कालच माझा Home Quarantine period संपलेला आहे! काही symptoms/लक्षणे जाणवली नाहीत ! आता जीवनावश्यक वस्तू विकत घ्यायला बाहेर पडू शकतो ह्याचा दिलासा आहे! ह्या काळात ज्यांनी positivity दिली त्यांना मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी डोक्याची मंडई केली त्यांना “Lockdown संपला की भेट बाहेर.... तुला दाखवतो”
अमेयचा हा क्वारंटाईनच्या या कालावधीत घरातच बसून होता. शिवाय घरात बसून काही मजेशीर व्हिडीओही सोशल मिडीयावर पोस्ट करत होता. या व्हिडीओजला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसादही अमेयला मिळतोय.