By  
on  

नव्या थरारक वेबसिरीजमध्ये झळकणार अभिनेत्री अनुजा साठे

सध्या देशभरात लॉकडाउन होण्याच्या आधीच सर्व प्रकारचे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. कला विश्वाचं काम बंद असल्याने कलाकारही या दरम्यान घरीच आहेत. मात्र ज्या कामाचं चित्रीकरण याआधी झालेलं आहे ते प्रोजेक्ट आता प्रदर्शित होताना दिसत आहेत. नुकतच आगामी वेबसिरीज ‘एक थी बेगम’चं पोस्टर प्रदर्शित झालय.


एम एक्स प्लेयरवर लवकरच ही नवीन थरारक वेबसिरीज पाहायला मिळणार आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री अनुजा साठे ही मुख्य भूमिकेत आहे. ही वेबसिरीज हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजचा ट्रेलर येत्या 6 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. 
एक अशी बेगम आहे जिने अंडरवर्ल्ड गँगस्टरला आव्हान दिले. या  धाडसी आणि घायाळ करणारं सौंदर्य असलेल्या बेगमचा प्रवास या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. सत्य घटनेवर प्रेरित असलेल्या या वेबसिरीजमध्ये अनुजा साठे ही बेगमची भूमिका साकारतेय. अभिनेता संतोष जुवेकरचीही या वेबसिरीजमध्ये भूमिका आहे. एम एक्स प्लेयरची निर्मिती असलेल्या या वेबसिरीजचं लेखन-दिग्दर्शन सचिन दरेकर यांनी केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sunshine mixed with a little hurricane .... #thatsme #instathoughts #easybreezy #anujasathe #photooftheday

A post shared by Anuja sathe (@anujasathe9) on

या वेबसिरीजमधून अनुजा वेब विश्वात पदार्पण करत आहे. अभिनेत्री अनुजा साठेने आत्तापर्यंत बऱ्याच मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'परमाणू' या हिंदी सिनेमात अनुजा ही अभिनेता जॉन अब्राहमसोबत दिसली होती. शिवाय 'ब्लॅकमेल' या हिंदी सिनेेमात ती अभिनेता इरफान खानसोबत झळकली होती.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive