'रंग हे नवे नवे.....दुनिया है नयी नयी' हे गाणं सर्व आजही गुणगुणतात. कॉफी आणि बरंच काही... या हलक्या फुलक्या लव्ह स्टोरीने प्रेक्षकाची मनं जिंकली होती आणि बॉक्स ऑफीसवरही हा सिनेमा यशस्वी ठरला. प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही रोमॅण्टीक जोडी प्रेक्षकांना खुप भावली. सोबतच भूषण प्रधान व अभिनेत्री नेहा महाजन यांच्या केमिस्ट्रीनेही चार चॉंद लावले. आज या सिनेमाला प्रदर्शित होऊन तब्बल पाच वर्ष पूर्ण होत आहेत, ही खास आठवण अभिनेत्री प्रार्थना बेहरेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन केली आहे.
रिफ्रेशिंग सिनेमा म्हणून प्रेक्षकांनी या सिनेमाकडे पाहिलं आणि पसंतीची पावतीही दिली. दिग्दर्सक प्रकाश कुंटेंनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. तर दिग्दर्शक रवी जाधव यांनी या सिनेमाच्या निर्मिती केली होती.