By  
on  

गायक राहुल देशपांडे आणि त्यांच्या लेकीचा हा क्युट व्हिडियो तुम्हाला नक्की आवडेल

लॉकडाऊनमुळे हे सध्या वर्क फ्रॉम होम करणा-यांची संख्या मोठी आहे. अशा वेळी प्रत्येकजण घरात राहून काम करत आहेत. छंदांना उजाळा देत आहेत. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेही सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत. राहुल यांचा त्यांच्या लेकीसोबतचा एक व्हिडियो खुप व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल यांची लेक त्यांना ‘तु असं गाऊ नको, सगळे तुझ्यावर हसतील, तु असं लाईव्ह वर गाऊ नको सांगत आहे.’

 

 

यानंतर दोघं बाप-लेक ‘युवती मना दारुण’ हे नाट्यपद गात आहेत. यामध्ये ती राहुल यांना दिनानाथ मंगेशकरांसारखं गायला सांगत आहेत. बापलेकीचा हा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला असून याला लाईक्स मिळत आहेत. राहुल देशपांडे हा आजोबा आणि हिंदुस्तानी संगीत शैलीतील प्रसिध्द गायक डॉ.वसंतराव देशपांडे साकारतोय. 'मी वसंतराव'  या सिनेमात राहुल देशपांडे वसंतरावांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive