By  
on  

सेटवरील इशा केसकर आणि शर्मिला शिंदेचा हा व्हिडियो एकदा पाहाच

मालिकांमध्ये, शोमध्ये भलेही दोन अभिनेत्री एकमेकांच्या विरोधात असतील. पण ऑफस्क्रीन मात्र त्यांची मैत्री असते. त्यातूनच सेटवर अनेक गमती-जमती घडत असतात. आताही एक व्हिडियो व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये इशा शर्मिलाच्या ओठांवर काजळ पेन्सीलने मिशी काढताना दिसत आहे. तर शर्मिला यावर चांगलीच वैतागली आहे.

 

 

या पोस्टला कॅप्शन देताना शर्मिला म्हणते, ‘एखाद्या दिवशी तुमच by chance लवकर pack up होत पण तुमचे मित्र काहीना काहीतरी करत राहतात ज्याने करून तुम्ही लवकर घरी जाऊ शकणार नाही आणि अक्खा दिवस सेट वर राहाल कारण त्यांच pack up झाल नाहीये.. मित्र ही छळकुटी जात होय. P.S. - @ishakeskarrr तुझा screw ढिला आहे.’ या दोघींमधीलही धमाल त्यांच्या फॅन्सना नक्कीच आवडेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive