पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी सर्व लाईट घालवून दीप प्रज्वलित करण्यास सांगितलं होतं. यामागे करोनाशी लढताना एकजूट सकारात्मकता अबाधित रहावी हाच उद्देश होता. पंतप्रधानांच्या या आवाहनाला तमाम देशवासियांसोबतच राजकीय, उद्योगपती व सिनेवर्तुळातून भरघोस प्रतिसाद मिळाला. भारताच्या ह्या एकजूटीचं दर्शन संपूर्ण जगाला घडलं. इतकंच नव्हे तर अत्यावश्यक सेवेतील म्हणजेच सैन्यदल, अग्निशमक दल यांनीही दीप प्रज्वलित करुन मोदींच्या आवाहनाला साद दिली.
कितीही संकंट येऊ दे...आम्ही डगमगणार नाही, नेटाने आमचा लढा सुरुच ठेऊ हा संदेश प्रत्येकाने काल दीपप्रज्वलित करत दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला मराठी सिनेवर्तुळातून प्रचंड प्रतिसाद दिल्याचा प्रचिती सोशल मिडीयावरील फोटो व व्हिडीओतून आली. संपूर्ण देश आज एकत्र आहे व एकजूटीने आम्ही करोनारुपी राक्षसाचा खात्मा करु असेच भाव यावेळी प्रत्येकाच्या चेह-यावर होते.