संपूर्ण देशवासियांनी पंतप्रधान मोदींच्या ५ एप्रिल रोजी ९ वाजता ९ मिनिटांपर्यंत दीपप्रज्वलन करण्याच्या आवाहनाला भरभरुन प्रतिसाद दिला. कितीही संकंट येऊ दे...आम्ही डगमगणार नाही, नेटाने आमचा लढा सुरुच ठेऊ हा संदेश प्रत्येकाने काल दीपप्रज्वलित करत दिला.सिनेवर्तुळातून सेलिब्रिटींनी प्रचंड प्रतिसाद दिल्याची प्रचिती सोशल मिडीयावरील फोटो व व्हिडीओतून आली. संपूर्ण देश आज एकत्र आहे व एकजूटीने आम्ही करोनारुपी राक्षसाचा खात्मा करु असेच भाव यावेळी प्रत्येकाच्या चेह-यावर होते.
या सर्व सेलिब्रिटींच्या फोटो व व्हिडीओंपैकी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा व्हिडीओ हा लक्षवेधी ठरला. माधुरी व डॉ. श्रीराम नेने यांच्या घराची काळजी घेणारा स्टाफ हा या लॉकडाऊन काळातसुध्दा त्यांच्यासोबतच राहतोय व मानापासून काळजी घोतोय. तसंच माधुरीच्या आईची तब्येतीची काळजी घेणारी नर्सही घरीच राहतेय म्हणून या सर्वांची माधुरीने दिवे उजळताना खास मराठीतून कृतज्ञता व्यक्त केली. इतकंच नव्हे तर श्रीराम नेने यांनीही मराठीतच संवाद साधला.
तसंच महत्त्वाचं म्हणजे स्वत: जीव धोक्यात घालून देशवासियांची सेवा करत अहोरात्र झटणा-या पोलिस कर्मचा-यांना, डॉक्टर-नर्सेसना, स्वयंसेवकां प्रति माधुरीने खास मराठीतून कृतज्ञता व्यक्त केली.
पाहा व्हिडीओ