Photo : कोठारे कुटुंबाच्या ह्या क्युट फोटोवर होतोय लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव

By  
on  

महेश कोठारे व त्यांचं संपूर्ण कुटुंब हे नेहमीच चर्चेत असतं. प्रत्येक कार्यात त्यांचा हिरहिरीने सहभाग पाहायला मिळतो. पण सध्या उर्मिला कोठारे व आदिनाथ कोठारे यांची गोड चिमुकली जिजा ही खुप चर्चेत असते. अनेक गोंडस फोटो व खोडकर व्हिडीओंमुळे तिही कोठारे कुटुंबासारखीच चाहत्यांची लाडकी आहे. 

जिजाची आई उर्मिला कोठारेने नुकतंच एक क्युट  फॅमिली फोटो शेअर केला आहे त्यावर चाहत्यांनी अक्षरश कॉमेंट्स व लाईक्सचा वर्षाव केला आहे. एका व्हॅकेशनची ही आठवण उर्मिलाने शेअर केलीय. या फोटोत उर्मिला व आदिनाथसह हुडी घातलेली जिजा खुप क्युट वाटतेय.हा एकदम परफेक्ट फॅमिली पिक्चर आहे. अमृता खानविकरसह अनेकांनी किती गोड..म्हणून कॉमेंट्स केल्या आहेत. 

छोटी जिजा खुपच चुणचुणीत आहे. आई उर्मिला कोठारेसोबतचे तिचे अनेक व्हिडीओज खुप व्हायरल होतात. जिजा उत्तम नकलासुध्दा करते, हे अळीमिळी गुपचिळी कार्यक्रमात सर्वांनाच समजलं. 

Recommended

Loading...
Share