आजपासून पुन्हा ‘तुला पाहते रे’ प्रेक्षकांच्या भेटीला 

By  
on  

लॉकडाउनमुळे सध्या सगळ्या प्रकारचं चित्रीकरण ठप्प आहे. अर्थात ते बंद करण्यात आलेलं आहे. या परिस्थितीत मालिका विश्वातली परिस्थिती अशी की, ज्या चित्रीकरण करुन ठेवलय त्यांचे एपिसोड दाखवले जात आहेत. ज्याचं चित्रीकरण बाकी होतं त्यांचे जुने एपिसोड टेलेकास्ट होत आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांचं मनोरंजन थांबू नये यासाठी काही जुन्या आणि प्रेक्षकांच्या आवडत्या मालिंकाचं पुन:प्रक्षेपण करण्यात येत आहे.

‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील जोडी, मालिकेतील ट्विस्ट लोकांना प्रचंड आवडले. सुबोध भावे आणि गायत्री दातार या जोडीला पसंती मिळाली. आणि हीच मालिका आजपासून म्हणजेच 6 एप्रिलपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील सुबोध भावेची बिझनेसमन विक्रांत सरंजामे आणि गायत्री ही ईशा या भूमिका होत्या. या मालिकेतील दोघांचं लग्न हे देखील चांगलाच चर्चेचा विषयी राहिला होता. यातील सुबोध भावेच्या भूमिकेतील ट्विस्ट पाहणं इंटरेस्टिंग ठरलं होतं. या मालिकेतून अभिनेत्री गायत्री दातारच्या टेलिव्हिजन करियरला सुरुवात झाली आणि पहिल्याचं मालिकेतून तिचा मोठा चाहता वर्गही तयार झाला. आणि आता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 


लॉकडाउनच्या या काळात प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका पुन्हा टेलिव्हिजनवर आणण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. घरात बसून सध्या वेब आणि टेलिव्हिजनकडे लोक जास्त वळली आहेत. त्यातच अशा मालिका पुन्हा पाहता येत असल्याने प्रेक्षकांचं घरात बसून नक्कीच मनोरंजन होत असेल. 

Recommended

Loading...
Share