पाहा Trailer : 'एक थी बेगम' वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, वेबसिरीजमध्ये आहेत हे मराठी कलाकार

By  
on  

सध्या लॉकडाउनमुळे घरात बसलेला प्रेक्षकवर्ग ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळलाय. त्यामुळे अनेक वेबसिरीज सध्या प्रदर्शित होत आहेत. त्यातच 'एक थी बेगम'  या वेबसिरीजचं नाव सध्या लक्षवेधी ठरतय. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

'
अभिनेत्री अनुजा साठे या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिकेत म्हणजे सपना दीदीच्या भूमिकेत आहे. अनुजासह या वेबसिरीजमध्ये अंकित मोहन, संतोष जुवेकर, अमितराज, चिन्मय मांडलेकर, अभिजीत चव्हाण, राजेंद्र शिरसटकर, विजय निकम, रेशम, प्रदीप डोईफोडे, विठ्ठल काळे, अनिल नागरकर, सुचित जाधव, राजू आठवले हे मराठी कलाकार आहेत. सचिन दरेकर यांनी या वेबसिरीजचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे.
सत्य घटनेपासून प्रेरित ही वेबसिरीज आहे. या सिरीजमधून अश्रफ खान म्हणजेच सपना दीदी कथा उलगडली जात असल्याची चर्चा आहे. या वेबसिरीजमध्ये 1986चा काळ दाखवला आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा जीव घेण्याचं स्वप्न ज्या महिलेने उराशी वाळगलं ती महिला म्हणजे सपना दीदी. याविषयावर हिंदीतही सिनेमा येणार होता. विशाल भारद्वाज या सिनेमाची निर्मिती करणार असल्याचं बोललं जात होतं. ज्यात दीपिका पदुकोण आणि इरफान खान झळकणार होते. मात्र तो सिनेमा झाला नाही. 

'एक थी बेगम' ही वेबसिरीज हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या 8 एप्रिलपासून ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
 

Recommended

Loading...
Share