या कारणासाठी अमृता खानविलकरने पति हिमांशूला केलं होतं अनफॉलो

By  
on  

कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सध्या देशात लॉकडाउन आहे. या लॉकडाउनमुळे घरात बसून बराच वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवण्याची संधीही सगळ्यांना मिळाली आहे. यात कलाकारही मंडळीही घरात त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरही तिचा पति हिमांशू आणि आईसोबत एकत्र राहतेय. त्यातच तिला आता हिमांशूसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येतोय.
काही कालावधी पूर्वी अमृताने सोशल मिडीयावर हिमांशूला अनफॉलो केल्यानं दोघ्यांच्या नात्यात दुरावा येत असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र या विषयावर अमृताने नुकत्याच एका प्रसिद्ध वृत्तपत्राला  दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.


अमृता म्हणते की, “हिमांशू एका चित्रीकरणासाठी बरेच महिने बाहेर होता आणि मला त्याची आठवण येत होती. एका रात्री मला त्याच्यासोबत खूप बोलायचं होतं, पण तो सारखा त्याला लवकर झोपून सकाळी 5 वाजता शूटसाठी जायचं असल्याचं बोलत होता. मी एक माणूस म्हणून एक्सप्रेसीव नाही आणि त्याला हे सांगू शकले नाही की मला त्याची आठवण येत आहे. मग आमचं भांडण झालं. मी त्याच्यावर नाराज होते आणि म्हणून मी त्याचा नंबर ब्लॉक केला आणि त्याला सोशल मिडीयावरही अनफॉलो केलं होतं.”
पुढे अमृता म्हणते की, “नंतर माझ्या लक्षात आलं की मी किती बालीश होते आणि सकाळी त्याचा नंबर अनब्लॉक केला. हिमांशू म्हटला की तो रात्रभर मला सतत फोन करत होता. पण हे माहीत नव्हतं की यामुळे आमच्या नातेसंबंधात काही प्रॉब्लेम असल्याच्या चर्चांना उधाण येईल.”


हिमांशूविषयी बोलताना पुढे अमृता सांगते की, “आमच्या लग्नाला जवळपास 5 वर्षे झाली असतील आमचं लग्न आणि नातेसंबंध अखंड सुरु ठेवण्याचं पूर्ण श्रेय मी हिमांशूला देते. तो एक असा माणूस आहे जो आमचं जीवन संतुलीत ठेवतो. एवढचं नाही तर तो माझ्या करियरमध्येही तितकचं लक्ष देतो.”

सध्या लॉकडाउनमध्ये हिमांशू आणि अमृता एकत्र क्वालिटी टाईम घालवत आहेत. शिवाय सोशल मिडीयावरही त्यांचे व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात. 
 

Recommended

Loading...
Share