सध्या क्वारंटाईन काळात तब्बल २१ दिवस प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडणार नाही अशी सरकारने सक्त ताकीद दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. हे करोनारुपी युध्दावर आपल्याला लवकरात लवकर विजय मिळवायचा आहे.
मनोरंजन विश्वालाही या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. या क्वारंटाईन काळात लाडके सेलिब्रिटीसुध्दा घरीच कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. कोणी छंद जोपासतोय तर कोणी घरकामात व्यस्त आहे तर कोणी जुन्या आठवणीत रममाण झालं आहे. पण तुमच्या सर्वांची लाडकी अनू म्हणजेच म्हणजेच हे मन बावरे मालिकेतील प्रसिध्द अभिनेत्री या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग चित्रकलेची आवड जोपासण्यासाठी करतेय. नेहमी शूटींगच्या बिझी शेड्यूलमधून आपली जोपासायला या कलाकारांना शक्य नसतं. त्यामुळे लॉकडाऊन ही खुप छान संधी आहे व त्याचा उपयोग प्रत्येकाने करायला हवा.
स्केचेसचे फोटो शेअर करत मृणाल म्हणते, चित्रकला माझी आवड आहे. खुप दिवसानंतर मला चित्रकलेसाठी वेळ मिळाला,तुम्हाला आवडली का...तुम्ही घरी काय करताय.
अभिनेत्री मृणाल दुसानिस सध्या शूटींग बंद असल्याने आपल्या नाशिकच्या घरी लॉकडाऊनचा काळ आई-बाबांसोबत घालवतेय. तर तिचे पती निरज मोरे हे परदेशात वास्तव्यास आहेत.