By  
on  

Photo: ओळखलंत का चिमुरडीला, आता आहे आघाडीची अभिनेत्री

सध्या क्वारंटाईन काळात तब्बल २१ दिवस प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. घरी राहून करोनाला हरवायचं आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडणार नाही अशी सरकारने सक्त ताकीद दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. हे करोनारुपी युध्दावर आपल्याला लवकरात लवकर विजय मिळवायचा आहे.

मनोरंजन विश्वालाही या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. या क्वारंटाईन काळात लाडके सेलिब्रिटीसुध्दा घरीच कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. कोणी छंद जोपासतोय तर कोणी घरकामात व्यस्त आहे तर कोणी जुन्या आठवणीत रममाण झालं आहे. बिझी शेड्यूलमुळे आणि शूटींगच्या तारेवरच्या कसरतीमुळे जुन्या आठवणींबदद्ल बोलायला, ते फोटो पाहून हरखून जायला वेळच मिळत नाही. त्यामुळे आता ह्या वेळेचा सदुपयोग सेलिब्रिटी करतायत. 

तुम्ही ह्या गोड चिमुकलीला ओळखलंत का.... ही आहे, सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरे. तिने इन्स्टाग्रामवरुन हा फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. प्रार्थनाने हा शालेय जीवनातील वेशभूषा स्पर्धेतील हा फोटो आहे. तिलासुध्दा हा फोटो पाहून जुन्या आठवणीत रममाण व्हायला मिळालं आहे.

भूषण प्रधान व प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला 'अजिंक्य' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज होता, परंतु करोना संकटामुळे तो आता पुढे प्रदर्शित होईल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ajinkya & Ritika .... . . : @aunkymonky @ajinkyamarathimovie @bhushan_pradhan

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive