आपल्या मुलांचे प्रत्येक क्षण टीपण्याची आणि ते क्षण जपून ठेवण्याची प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. अशीच ईच्छा आहे अभिनेता स्वप्निल जोशीची. आणि म्हणूनच मुलगी मायरा आणि मुलगा राघवसाठी स्वप्निल जोशीने केली आहे खास गोष्ट.
अभिनेता स्वप्निल जोशीने नवीन यूट्यूब चॅनल सुरु केलय. या चॅनलचं नाव आहे पिल्लू टिव्ही. हे चॅनल त्याने खास त्याच्या मुलांसाठी सुरु केलय. ‘पिल्लू टिव्ही’मध्ये स्वप्निलने आपल्या मुलांचे टिपलेले खास क्षण आहेत. मायरा आणि राघवच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण या व्हिडीओमध्ये आहेत. स्वप्निलचा मुलांसोबतच्या या आठवणींचा साठा म्हणजे हे ‘पिल्लू टिव्ही’ आहे. हे व्हिडीओ मजेशीर असून मायरा आणि राघव यांचं भावा-बहिणीचं नातही यात पाहायला मिळतय.