By  
on  

 प्रत्येकाने किमान 100 रुपये तरी पंतप्रधान मदत निधीला द्यायला हवे – आशा भोसले

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर देशभरात लॉकडाउन आहे. यादरम्यान कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधी जमा करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यासाठी पुढे आली आहेत. मात्र प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी यावर एक उपाय सुचवला आहे.

नुकतच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आशा भोसले यांनी यावर महत्त्वाचं विधान केलं आहे. आशा भोसले म्हणतात की, प्रत्येकाने काही ना काही तर किमान 100 रुपये पंतप्रधान  मदत निधीला द्या. देशातल्या १३० कोटी देशवासियांनी जर प्रत्येकी १०० रुपयांची मदत केली तर १३,००० कोटी रुपये आपण उभे करु शकू. ही रक्कम गरजवंतांसाठी उपयोगात आणता येईल. इतकी ताकद १०० रुपयांत आहे.” असं त्या म्हणाल्या. 
सध्याची संपूर्ण जगाची आणि विशेष करून देशाची जी परिस्थिती आहेत त्यात कोरोनाग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदतीचा हात पुढे येणं गरजेचं आहे. यातच आशा भोसले यांनी मोलाचा संदेश दिला आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive