By  
on  

ऋता दुर्गुळे आणि सुमीत राघवन झळकणार एकत्र ? दोघांनी केला व्हिडीओ कॉल

सध्याच्या लॉकडाउनमुळे कला विश्वाचही काम ठप्प झालं आहे. मात्र कलाविश्वातील कलाकार घरात बसूनच त्यांची कला जोपासत आहेत. विविध व्हिडीओच्या माध्यमातून किंवा लाईव्ह येऊन चाहत्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न ते करत आहेत. यातच अभिनेत्री ऋता दुर्गुळेने अभिनेता सुमीत राघवनला व्हिडीओ कॉल केला आहे. या व्हिडीओ कॉलचा व्हिडीओ ऋताने सोशल मिडीयावर शेयर केला आहे. 

या व्हिडीओ कॉलमध्ये दोघं 15 एप्रिलचा उल्लेख करत आहेत. यावरुन दोघं नेमकं कशाविषयी बोलत आहेत हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र दोघं नक्कीच काहीतरी नवं काहीतरी घेऊन येणार  असल्याचं समोर येत आहे. सध्या सोशल मिडीया आणि वेबच्या माध्यमातून कलाकार चाहत्यांसोबत, प्रेक्षकांसोत संवाद साधण्याचा आणि त्यांचं मनोरंजन करण्याचं प्रयत्न करत आहेत. ऋता आणि सुमीत यांचाही असाच काहीसा प्रयत्न असावा हे या व्हिडीओतून लक्षात येत आहे.  अभिनेता सुमीत राघवनने मात्र त्याच्या पोस्टमध्ये दोगं काहीतरी घेऊन येत असल्याचा उल्लेख केला  आहे. यापोस्टमध्ये सुमीत म्हणतो की, "ती माझी कोण किंवा मी तिचा कोण? ओळखा.." तेव्हा नेमकं दोघं कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील याची उत्सुकता आहे. शिवाय यानिमित्ताने हे दोन गुणी कलाकार एकत्र झळकणार असतील तर ते पाहणं रंजक ठरेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Hello my isolated friends.. Hope you all are at home and safe. Please take care of yourself. Do not venture out. Please. OKAAAAY..so myself and @hruta12 are coming up with something cool. We just had a video call.. See if you can guess anything. There are very subtle clues. ती माझी कोण किंवा मी तिचा कोण? ओळखा.. And also tell me if you would like seeing the both of us together. Wait for #15thApril cc: @sho_neel #Repost @adorable_hruta12 (@get_repost) ・・・ Repost @hruta12 . Hello guys... Covid-19 chya isolation madhe me mazya eka "friend" la video call kela. Tasa to pan gharich ahe, me pan gharich ahey... Ani tumhi sudha gharich basun amcha purna call bagha! 15th April ya tarkhela me rya friend barobar yeinch tumhala bhetayala! See you all soon! Aani Ho tar ha aahe..... maza..... pls watch and let me know if you like him! @sumeetraghvan

A post shared by Sumeet Raghvan (@sumeetraghvan) on

 

आता दोघं 15 एप्रिलला नेमकं करणार तरी काय यासाठी त्यांच्या अपडेट्सकडे लक्ष ठेवावं लागणार एवढं नक्की.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive