By  
on  

 पाहा Photos : मांजरेकर परिवाराचा असा सुरु आहे क्वारंटाईन टाईम 

लॉकडाउनमुळे ज्या कुटुंबाला रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एकमेकांसाठी वेळ नव्हता ते कुटुंब आता घरात बसून एकत्र वेळ घालवत आहेत. यातच कला विश्वातील कलाकारही या निमित्ताने कुटुंबाजवळ आले आहेत. 
प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकरदेखील या निमित्ताने संपूर्ण परिवारासोबत वेळ घालवत आहेत. महेश मांजरेकर, पत्नि मेधा मांजरेकर, मुलगा सत्या मांजरेकर आणि मांजरेकर यांच्या  लेकी हा संपूर्ण परिवार घरात एकत्र वेळ घालवत आहेत. सोशल मिडीयावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओमधून हे पाहायला मिळतय. नुकतच सई मांजेरकरने सोशल मिडीयावर कुटुंबासोबतचे एकत्र फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

my favourite potatoes to share the couch with #couchpotato @satyamanjrekar

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

नुकताच महेश मांजरेकर घरात सगळ्यांसाठी जेवण बनवत असतानाचा व्हिडीओही सोशल मिडीयावर पाहायला मिळाला होता.महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकरने ‘दबंग-3’ सिनेमातून सिने विश्वात पदार्पण केलं आहे. तर मानलेली मुलगी गौरीही ‘पांघरुण’ या मराठी सिनेमातून डेब्यू करतेय. मुलगा सत्या मांजरेकरनेही काही मराठी  सिनेमांमध्ये काम केलं  आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

sab haath bataao! swipe to see the final outcome

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive