By  
on  

कोरोनाचा ‘राक्षस’ नक्की पळवून लावू – सई ताम्हणकर 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपण सगळेच घरी आहोत. मात्र आपल्यासाठी कोरोनाशी लढा देणारे डॉक्टर्स, नर्स, पोलिस आणि इतर सरकारी कर्मचारी हे स्वत:चा विचान न करता या लढ्याला सामोरं जात आहेत. मुंबई पोलिसही यात कसोशीनं प्रयत्न करत आहेत. आपल्या कुटुंबाचा विचार न करता सतत सेवेसाठी तैनात असणाऱ्या या पोलिसांचं कौतुक होत आहे. 

अभिनेत्री सई ताम्हणकरनेही मुंबई पोलिसांचा एक व्हिडीओ शेयर करत त्यांचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये सई म्हणते की, “जगात भारी मुंबई पोलिस”सईच्या या ट्विटला उत्तर म्हणून मुंबई पोलिसच्या ऑफिशियल ट्टिवटर हॅंडलवरुन एक मजेशीर ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सईच्या सिनेमांच्या नावांचा वापर करत उत्तर दिलयं. ते म्हणतात की, “भारी तर मुंबईकर आहेत, आम्ही फक्त मुंबईला पुन्हा एकदा 'झकास' बनवण्याचं 'मिशन पॉसिबल' करण्याचा प्रयत्न करतोय.”

हा रिप्लाय पाहून मग सईनेही अशाच पद्धतिने मुंबई पोलिसच्या ट्विटवर उत्तर दिलं. सई म्हणते की, “तुमच्या या ‘दुनियादारी’त आम्ही सगळे तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. कोरोनाचा ‘राक्षस’ नक्की पळवून लावू.”

या सगळ्या ट्विटमध्ये सई ताम्हणकरच्या सिनेमांच्या नावाचा वापर करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिस आणि सईचा ट्विटरवरील हा फिल्मी संवाद चर्चेत आला आहे. मात्र मुंबई पोलिसांच्या कामगिरीला सलमा तर आहेच मात्र ते बाहेर आहेत म्हणून आपण घरी राहणं गरजेचं आहे हे आवाहनही सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive