By  
on  

रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस लुक, नेटिझन्स झाले फिदा...

'सैराट'फेम रिंकू राजगुरूचं अलीकडे कोणत्याच सिनेमात झळकली नाहीय. रिंकू सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. मध्यंतरी एका जाहिरातीमध्ये तिचं दर्शन झालं होतं. पण त्यानंतर ती पडद्यापासून बराच काळ लांब आहे.पण लवकरच तिची प्रमुख भूमिका असेलला 'कागर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'सैराट'मध्ये तिचा लुक 'गाव की छोरी' असा होता. पण या गाव की छोरीने आता आपलं संपूर्ण रुपचं बदलून टाकलं आहे.  संपूर्ण सिनेमाभर पंजाबी ड्रेसच्या लूक मध्ये दिसलेली रिंकू आता ग्लॅमरस झाली आहे. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले. या फोटोमध्ये ती मॉडर्न लूकमध्ये दिसून येत आहे. व्हाईट जॅकेट आणि ब्लू टॉप घातलेल्या रिंकूचे ग्लॅमरस अवतारातील फोटो नेटिझन्सना खूपच आवडले आहेत.

'सैराट' मधील डॅशिंग गर्ल गेली कुठे असा प्रश्न रिंकूच्या चाहत्यांना पडला होता. पण रिंकू ही कसर सोशल मीडियाच्या माध्यमातून भरून काढताना दिसत आहे.आता लवकरच तिला सिनेमामध्ये पाहण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.

https://www.instagram.com/p/Bq6laY9luWj/

Recommended

PeepingMoon Exclusive