By  
on  

Lockdown मध्ये सुरुचीने शेअर केले बोल्ड फोटो, चाहते म्हणाले 'उफ्फ तेरी अदा...'

आज करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी  लॉकडाऊनमुळे सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. तर काही आपले हॉट आणि बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत या उन्हाळ्यात आणखी तापमान वाढवतायत. 

'का रे दुरावा'फेम अदिती म्हणजेच अभिनेत्री सुरुची अडारकरने  रसिकांच्या  मनावर अधिराज्य गाजवलं. नेहमीच सोज्वळ आणि सिंपल  लुकमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणा-या सुरुचीचे ब्लॅक थीमचे हॉट फोटो या लॉकडाऊन दरम्यान सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. 

या फोटोत फिट आणि फाईन दिसण्याबरोबरच चाहत्यांना फिटनेस गोल्स देणा-या सुरुचीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा चाहत्यांनी वर्षाव केला आहे. इतकंच नाहीतर इंडस्ट्रीतील इतर कलाकार मंडळींनीही या फोटोंवर पसंतीची मोहोर उमटवली आहे. पूजा सावंत, अभिजीत खांडकेकर, ऋजूता बागेव आदी सर्वांनीच सुरुचीच्या फोटोंवर प्रतिक्रीया दिली  आहे. 

  प्रसिध्द सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने सुरुचीचं हे जबरदस्त फोटोशूट केलं आहे, 

झी युवावरील अंजली ही सुरुचीची प्रमुख भूमिका असेलली मालिकासुध्दा प्रचंड गाजली. त्यानंतर तिने पुन्हा सुयश टिळकसोबत याच वाहिनीवरील 'एक घर मंतरलेलं' या रहस्यमयी मालिकेत न्यूज रिपोर्टरची भूमिका साकारली होती.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive