By  
on  

बिग बी अमिताभ बच्चन यांचा हा मराठी सिनेमा नाही होणार प्रदर्शित

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाउनच्या आधीच सिनेमागृहेही बंद करण्यात आली होती. याचा फटका त्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या सिनेमांना बसला. यात एबी आणि सिडी हा मराठी सिनेमाही प्रदर्शित झाला होता. मात्र त्याच दरम्यान सिनेमागृहे बंद करण्यात आल्यानं हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता आला नाही.


'एबी आणि सिडी' या सिनेमात अभिनेता विक्रम गोखले मुख्य भूमिकेत आहेत. तर बिग बी अमिताभ बच्चन यांचा हा पहिला मराठी सिनेमा आहे. या सिनेमात बिग बींचीही महत्त्वाची भूमिका आहे. मात्र या सिनेमाच्या निर्मात्यांनी याच्या प्रदर्शनाच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित न करता हा सिनेमा ते ओटटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित  करणार आहेत. एका प्रसिद्ध न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार या सिनेमाचे निर्माते अक्षय बर्दापुरकर यांनी हा निर्णय घेतला आहे. ते म्हणतात की, “परिस्थिती पुर्वपदावर येताना दिसत नाही. त्यामुळे आधी लोकांची सुरक्षा नंतर इतर गोष्टी हे लक्षात घेऊन आम्ही हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यासंदर्भात अमॅझॉन प्राईमसोबत चर्चा सुरू आहे.”


तेव्हा लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार एवढं नक्की. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive