आज करोना संकट ओढवल्याने सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत. फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. लॉकडाऊन दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. पण हा फोटो तुम्ही ओळखलात का....हा चिमुरडा आघाडीचा अभिनेता आहे तर त्याची आईसुध्दा अभिनेत्री आहे.
हा फोटोत दिसणारा गोड चिमुुकला म्हणजे तुमचा लाडका चॉकलेट बॉय अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आहे. सिध्दार्थची आई अभिनेत्री सीमा चांदेकर या फोटोत दिसतायत. तर हा फोटो शेअर करण्यामागचं कारण असं की,सिध्दार्थच्या आईचा आज वाढदिवस आहे व लॉकडाऊनमुळे तो आईकडे जाऊ शकत नाही. आई पुण्यात आहे तर सिध्दार्थ मुंबईत. फोटो शेअर करत सिध्दार्थ म्हणतो , " Happy Birthday आई. हे सगळं संपलं की लवकरात लवकर पुण्याला येऊन तुझ्यासाठी काहीतरी बनवून तुला खाऊ घालतो.हे वाकडं तोंड आम्ही कोरोना साठी केलय.."
यावरुनच हे दिसून आलं की, लॉकडाऊनमुळे गैरसोय फक्त सामान्यांचीच नाही तर सेलिब्रिटींचीसुध्दा होत आहे. अभिनेत्री सीमा चांदेकर यांना पिपींगमून मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लवकरच हे लॉकडाऊन संपू दे व ह्या मायलेकांची भेट होऊ दे, हीच सदिच्छा!