By  
on  

Video : संस्कृतीनं केलेलं हे सुंदर वॉल पेटींग तुम्ही पाहिलंत का ?

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. 

आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. मराठीतली बबली गर्ल संस्कृती बालगुडेनेसुध्दा या काळात तिच्या पेटींगच्या कलेवर खुप भर दिला आहे. 

संस्कृतीने नुकतंच स्वत: घरात वॉल पेटींग केलं आणि तुम्ही पाहाल तर तुम्हालाही ते खुपच आवडेल. सुरेख असं सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री आणि गायिका मर्लिन मन्रोचं चित्र तिने घराच्या भिंतीवर रेखाटलं व अप्रतिम रंगसुध्दा भरले. हे सुरेख चित्र रेखाटल्याचा तिला खुप अभिमान वाटतोय व तिचा तो उत्साह व्हिडीओ मधून पाहायलासुध्दा मिळतोय. संस्कृतीचा भाऊ समर्थ बालगुडेध्दा या व्हिडीओत तिला टिवल्या बावल्या करताना पाहायला मिळाला. पण एकूणच तिचं हे वॉल पेटींग जबरदस्त झालं आहे. 

 

संस्कृतीचं हे वॉल पेटींग तुम्हालाही नक्कीच आवडेल, खरंय ह्या लॉकडाऊन दरम्यान स्वत:ला आवडणा-या गोष्टींमध्ये मन रमवायचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Just created my HAPPY wall! ♥️ #BittaNBrushes #SanskrutiBalgude

A post shared by SanSKRuti BaLguDE (@sanskruti_balgude_official) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive