By  
on  

पाहा Video : ही अभिनेत्री तिच्या खास फ्रेंड्ससोबत घालवतेय वेळ

सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थिती सगळेच घरात बसून आहेत. कला विश्वातील कलाकारही सगळ्या प्रकारचे चित्रीकरण बंद असल्याने घरातच आहेत. त्यामुळे  काहीजण आपल्या पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवत आहेत. 

अभिनेत्री जुई गडकरी ही प्राणीप्रेमी आहे. तिच्या घरी मांजरी आहेत. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात ती तिच्या कुटुंबासोबत तसेच मांजरींसोबतही वेळ घालवतेय. नुकताच जुईने तिच्या मांजरींसोबत एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत जुईने तिच्या सगळ्या मांजरींना एकत्र जवळ घेतलयं. हा गोंडस व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या चर्चेत आहे. 

या पोस्टमध्ये जुई म्हणते की, "सध्या माझ्यासोबत हे होत आहे. जरी हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा असला तरी हे असं मी रोज करतेय. होय मी अशीच आहे. मी घरात पूर्णपणे अशी वेडी आहे आणि माझ्या  बेबीजच्या बाबतीत तर अशीच आहे.  या मांजरींचं मातृत्त्व करत असताना मला प्रत्येक क्षण आवडतोय. मी अजूनही घरीच आहे आणि तुम्हीही घरातच थांबा. घराच्या बाहेर पडू नका."

असं म्हणत जुईने तिच्या मांजरींसोबतचा गोंडस व्हिडीओ शेयर केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive