By  
on  

सुमीत राघवन आणि ऋता दुरगुळेचा हा लघुपट होणार प्रदर्शित 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या लॉकडाउन सुरु आहे. आणि या लॉकडाउनमध्ये घरात बसून मनोरंजन म्हणून पाहण्यासाठी वेब आणि सोशल मिडीयाकडे लोकांचा कल आहे. त्यातच ‘स्ट्रॉबेरी शेक’ हा लघुटप प्रदर्शित होत  आहे. 
या लघुपटात अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री ऋता दुरगुळे  मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. या निमित्ताने दोघांना पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळेल. 'स्ट्राबेरी शेक'  ही एक वडिल-मुलीच्या नात्याची गोष्ट आहे. जेव्हा एक नॉर्मल बाबा त्याच्या मुलीसाठी एक कूल बाबा बनण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची मुलगी सरळ  तिच्या बॉयफ्रेंडलाच घरी घेऊन बाबा समोर उभी करते तेव्हा त्या कूल बाबाची उडणारी तारांबळ आणि पुढे घडणाऱ्या घटना रंजक पद्धतिने या लघुपटात पाहायला मिळेल. लेखक व दिग्दर्शक शोनील यल्लातीकर याची ही व्यवसायिक दुसरी फिल्म आहे.  या लघुपटात ऋताच्या बॉयफ्रेंड ची भूमिका अभिनेता रोहित फाळकेने साकारली आहे.

या लघुपटाविषयी सुमीत राघवन सांगतो की, “मला यंग एनर्जी बरोबर काम करायला खूप आवडतं कारण त्यांची कल्पना शक्ती कमाल असते . शोनील खूप फोकस्ड असल्याने आणि स्टोरी मला आवडल्याने मी या कामाला होकार दिला. त्याचबरोबर ऋताशी  एक कलाकार म्हणून सुद्धा  सूर उत्तम जुळला.” तर ऋता याविषयी बोलते की, “ही शॉर्टफिल्म निवडताना नाही बोलण्याचा प्रश्न नव्हता. उत्तम गोष्ट , शोनील सारखा एक उत्तम  लेखक आणि दिग्दर्शक , सुमीत सरांसारखे एक दिग्गज अभिनेते तुमच्या समोर असल्यावर एका कलाकाराला आणखी काय हवे ?”


‘स्ट्रॉबेरी शेक’ ही एक अवॉर्ड विनिंग शॉर्टफिल्म आहे. येत्या 15 एप्रिलला हा लघुपट झी 5 वर पाहायला मिळणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive