By  
on  

 गुरुनाथने घरातच बनवल्या जीरा कुकीज

लॉकडाउनच्या या काळात मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग बहुतांश लोक करत आहेत. नेहमी चित्रीकरणामध्ये व्यस्थ असलेले कलाकारही या काळात या वेळेचा सदुपयोग करत त्यांचे छंद जोपासत आहेत. 
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून गुरुनाथ म्हणून प्रसिद्ध झालेला अभिनेता अभिजीत खांडकेकरलाही कुकिंगची आवड आहे. म्हणूनच सध्या लॉकडाउनच्या काळात घरात बसून अभिजीत विविध कुकिंग प्रयोग करुन पाहतोय. नुकतच त्याने बेकिंगचे प्रयोग केले आहेत. यात त्याने जीरा कुकीजही बनवल्या. ते बनवत असतानाचा व्हिडीओही अभिजीतने पोस्ट केला आहे. शिवाय या पोस्टमध्ये त्याच्या कलाकार मित्रमंडळींना टॅक करुन त्यांनाही कुकिंग चॅलेंज दिलय. अभिनेता अद्वैत दादरकरला त्याने यात टॅग केलं. मग अद्वैतनेही कुकिंग व्हिडीओ केला आणि बनवल्या केळ्याच्या पुऱ्या. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मी थांबलोय घरी, नव्या उत्साहाने करतोय छान काहीतरी.... तुम्हीसुद्धा घरीच थांबा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. घरबसल्या अशाच काही छान गोष्टी तुम्हीसुद्धा करत असाल तर त्या नक्की Video स्वरूपात तुमच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम हँडलवर share करा. पुढील video साठी मी nominate करतो @adwaitdadarkarofficial @sachin_deshpande या माझ्या मित्रांना. #EntertainmentDuringQuarantine #nonstopentertainment #ZeeMarathi #WorkFromHome #WorkForHome #lockdowndays #StaySafe #BreakTheChain #BreakTheCoronaOutbreak #IndiaFightsCorona @zeemarathiofficial @teamabhik

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

अभिजीत खांडकेकर त्याच्या पोस्टमध्ये घरी राहण्याच आवाहनही करतोय. तो म्हणतो की, “घरीच थांबा. मी थांबलोय घरी, नव्या उत्साहाने करतोय छान काहीतरी.... तुम्हीसुद्धा घरीच थांबा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. घरबसल्या अशाच काही छान गोष्टी तुम्हीसुद्धा करत असाल तर त्या नक्की Video स्वरूपात तुमच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम हँडलवर share करा.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कुठलीही नवीन गोष्ट शिकून ती करण्यासाठी @abhijeetkhandkekar ने मला नॉमीनेट केलं होतं..मी केळ्याच्या पुऱ्या करायला आज शिकलो..स्वतःचे दोष लपवण्यासाठी मुद्दाम व्हिडिओ असा शूट केलाय.. पुरी गोल लाटता आलेली नाही.. स्वयंपाक ह्या गोष्टीला कला का म्हटलं जातं हे आज कळलं.. खरंच ही कला आहे.. भक्ती च्या मदतीशिवाय हे मी पूर्ण करू शकलो नसतो..पण व्हिडिओ जरी मिनिट भराचा असला तरी कष्ट घेऊन काही पुऱ्या मी केल्या आहेत..आणि त्या चांगल्या झाल्या.. आता मी माझ्या अजुन काही मित्रांना नॉमीनेट करतो..@mihirnishithrajda @dalimbkar.pravin @umesh_jagtap18 @aashu.g Vc @bhakteedesai @zeemarathiofficial @zeeyuva #stayathome #staysafe #quarentine #qurantinelife #challenge #cooking #corona #gocorona #meera #workfromhome #workforhome #instachallenge #makingsomethingnew # #

A post shared by Adwaitdadarkar (@adwaitdadarkarofficial) on

अशा पद्धतिने अनेक कलाकार या निमित्ताने घरात बसून त्यांचे छंद जोपासत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive